Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल

नेवासाफाटा ः नेवासा येथील अल-अमिन एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी नेवासा खुर्द संचलित अल अमीन उर्दू हायस्कूलने इयत्ता दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाला

बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख
छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंती निमित्त अनाम प्रेम संस्थेस छावा संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
शरद पवारांची रणनीती मोदी सरकारला शह देणार का ? l Lok News24

नेवासाफाटा ः नेवासा येथील अल-अमिन एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी नेवासा खुर्द संचलित अल अमीन उर्दू हायस्कूलने इयत्ता दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून  यंदा पाचव्यांदा या शाळेचा 100 टक्के निकाल लागला असून यात मुलींनी  बाजी मारली आहे.
    इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी या विद्यालयातून 36 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.यात मुले व मुलींचा समावेश होता. इयत्ता दहावीच्या परीक्षेत कु.अनअमता अल्ताफ शेख 86.20टक्के (प्रथम), कु.आयशा अन्सार पठाण 85.40 टक्के (द्वितीय), कु.खतिजा शरीफ शेख 81.80 टक्के (तृतीय) यांनी विशेष यश संपादन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य व अल-अमिन उर्दू हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष महंमदभाई आतार, उपाध्यक्ष आजम खान कासमखान पठाण, सचिव मौलाना काजी इब्तेहाजोद्दीन हमिदोद्दीन, सहसचिव फारूकभाई आतार, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.

COMMENTS