Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कीर्ती व्यास हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित कीर्ती व्यास हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने तिचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना आमदार काळेंकडून मदत
एआयडीएमके आणि भाजप युतीला सुरूंग का?
शेतक-यांशी चर्चेस केंद्र सरकार तयार

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित कीर्ती व्यास हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने तिचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंधेरीतील बीब्लंट सलूनमध्ये हे तिघेही काम करत होते. कीर्तीच्या हत्या प्रकरणात सोमवारी न्यायालयाने दोषी ठरवले होते. मुंबईतील एका प्रसिद्ध सलून ब्रँडमध्ये किर्ती व्यास मॅनेजर पदावर काम करत होती. आरोपी सिद्धेश आणि खुशीही तिथेच काम करत होते. खराब परफॉमन्सबद्दल मॅनेजर किर्तीनं सिद्धेशला एका महिन्याची नोटीस दिली होती. याचा राग मनात धरून सिद्धेशने खुशीच्या मदतीने चालत्या गाडीत किर्तीची हत्या केली होती.

COMMENTS