Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे मालगाडीचे 6 डबे घसरून वाहतूक ठप्प

मुंबई ः मुंबईतील पश्‍चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजवळ रेल्वेच्या मालगाडीला अपघात झाला आहे. या मालगाडीवरुन वाहतूक करण्यात येणारे स्टील कॉईल रोल रु

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा मृत्यू
निसर्गातून नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान
नंदुरबार पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता… भाजपचा धुव्वा

मुंबई ः मुंबईतील पश्‍चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजवळ रेल्वेच्या मालगाडीला अपघात झाला आहे. या मालगाडीवरुन वाहतूक करण्यात येणारे स्टील कॉईल रोल रुळावर पडले आहेत. गुजरातहून मुंबईकडे जाणार्‍या मालगाडीचे पाच ते सहा डबे रुळावरून घसरल्याने ते पलटी झाले. त्यामुळे रेल्वे मार्गावरील ट्रॅक नंबर एक आणि दोन प्रभावित झाले आहेत. तर प्रशासनाकडून बचावकार्य केले जात आहे. तर पुढील दोन ते तीन तास येथील वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा डबे घसरले. त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणार्‍या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मालगाडीचे व रुळाचे काम पूर्ववत करण्याचे कामे रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र, मुंबईकडे जाणार्‍या ट्रेन काही काळासाठी बंद होण्याची शक्यता आहे. अपघातामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले असून रेल्वे रुळाजवळील इलेक्ट्रीक पोलही आडवा पडला आहे. मालगाडीतून वाहतूक करण्यात येत असलेल्या सामानाचेही नुकसान झाले असून अपघातानंतर रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर रेल्वेचे गार्डही घटनास्थळी धावत आले असून संबंधित रेल्वे कर्मचार्‍यांना मालगाडी पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS