Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे प्रादेशिक सा.बां. विभागात 1 हजार 33 कोटींचा निविदा घोटाळा

मंगेश पंचपोर यांजकडूनपुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या दैदिप्यमान कामगिरीने चांगलाच नावाजलेला विभाग आहे. मात्र या विभागात भ्रष

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे काय होणार ?
कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांचा बोगस टेंडरचा महाघोटाळा
श्रीमती सोनकवडेंचा अधिकारी, कर्मचार्‍यांवर नोटीसींचा पाऊस

मंगेश पंचपोर यांजकडून
पुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या दैदिप्यमान कामगिरीने चांगलाच नावाजलेला विभाग आहे. मात्र या विभागात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या अनेक सुरस कथा रंगतांना दिसून येत आहे. मात्र या कथा नसून यामागचे गौडबंगाल आणि निविदांचा घोटाळाच पुराव्यासह आमच्याकडेे आलेला आहे. या विभागात मुख्य अभियंता यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आणि निविदा मॅनेज करून तब्बल 1 हजार 33 कोटींच्या निविदांचा घोटाळा केल्याचे पुराव्यावरून दिसून येत आहे.

पुणे सार्वजनिक प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे या विभागाला निधी देखील मोठ्या प्रमाणावर मिळतो. याच विभागामध्ये रस्त्यांच्या कामांसाठी सन 2023-2024 या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 1 हजार 33 कोटींच्या निविदेच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. तब्बल 1 हजार 33 कोटींच्या निविदा काढून त्यातील निधी नेमका कुणाच्या घशात घालण्याचा डाव पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी रचला आहे, याचा पर्दाफाश लवकरच आम्ही सविस्तर प्रकाशित करणार आहोत.  मुख्य अभियंता यांच्या अखत्यारित साडेतीन कोटी ते 15 कोटींच्या निविदा मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्याचाच गैरवापर करत मुख्य अभियंत्यांनी तब्बल 1 हजार 33 कोटींचा निविदा घोटाळा घातला आहे. ही सर्व कामे रस्त्यांची कामे असून ती मुख्य अभियंता आणि अधिकारांचा गैरवापर करून मॅनेज केल्याचे दिसून येत आहे. या निविदा मॅनेजच्या माध्यमातून बोगस कामे, बोगस देयके, करण्याची प्रथा पाडण्यात येत आहे. त्यासंदर्भातील सविस्तर वृत्तांत उद्याच्या अंकात.

पुणे आयबी-2 मधील 263 कोटींची निविदेचे गौडबंगाल – पुणे आयबी-2 नवीन बांधकामासाठी जानेवारी 2024 मध्ये 263 कोटी रूपयांची निविदा काढली असून, या निविदेमागचे गौडबंगाल काय? निविदा काढतांना शासकीय नियम पायदळी तुडवून निविदा कुणाला मिळवून देण्याचा घाट घातला जात आहे, यासंदर्भात अनेक गौप्यस्फोट करणारे कागदपत्रे दैनिक लोकमंथनकडे आली असून, त्याचा पर्दाफाश लवकरच दोन दिवसांत करणार आहोत.

ठाणे-पनवेल सा.बां.विभागात 8 हजार 27 कोटींचा गैरव्यवहार – ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ अंतर्गत ठाणे आणि पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागात श्रीमती रूपाली पाटील आणि कांबळे यांनी हॅम्ब टप्पा क्रमांक-2 या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 8 हजार 27 कोटी रूपयांचे टेंडर काढण्यात आले. वास्तविक यातील बहुतांश कामे याआधीच पूर्ण झालेली असतांना 8 हजार 27 कोटींची कामे कशासाठी आणि कुणासाठी काढण्यात आली आहेत, यामागचे नेमके गौडबंगाल काय याचा सविस्तर पर्दाफाश पुढील दोन दिवसांत करणार आहोत.

मंत्री रवींद्र चव्हाणांचा हात आहे का ? – खरंतर सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यापासून रवींद्र चव्हाण यांना या विभागात विशेष रूची दिसून आलीच नाही. त्यामुळे अधिकारीच या विभागातील मंत्री असल्यासारखे निर्णय घेतांना दिसून येत आहे. पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागात तब्बल 1 हजार 33 कोटी रूपयांचा निविदा घोटाळा, ठाणे आणि पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागात हायब्रिड अ‍ॅन्युयिटी अंतर्गत तब्बल 8 हजार 27 कोटी रूपयांचा निविदा घोटाळा होत असतांना, यामागे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा तर हात नव्हे ना अशी चर्चा रंगतांना दिसून येत आहे.

पुणे ब्राम्हण सेवा संघांकडून अनेक तक्रारी – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराबद्दल ब्राम्हण पुणे संघांकडून अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पुणे शहराचे ब्राम्हण महासंघाचे शहराध्यक्ष मंगेश पंचपोर यांनी देखील या निविदांचे गौडबंगाल काय? पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचा भांडाफोड लवकरच…

कार्यकारी अभियंता रूपाली पाटील यांचा 50 कोटींचा अपहार – सार्वजनिक बांधकाम पनवेल विभागांतर्गत कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली पाटील यांनी सन 2022-2023, 2023-2024 या कालावधीमध्ये देखभाल दुरूस्ती आणि विशेष दुरूस्तीच्या नावाखाली तब्बल 50 कोटींची बोगस देयके अदा केली आहेत. विशेष म्हणजे या दुरूस्तीच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निधीसाठी अधीक्षक अभियंता यांची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे श्रीमती रूपाली पाटील यांनी देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली मनमानीपणा करत 50 कोटींचा अपहार केल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS