Homeताज्या बातम्यादेश

हेमंत सोरेन यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला

अंतरिम जामिनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली ः झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आाहे. कारण सोरेन यांची अंतरिम जामिनाची याचिका सर्वोच्च न्यायालय

हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी
बेपत्ता हेमंत सोरेन अखेर रांचीत दाखल
हेमंत सोरेन यांना 5 महिन्यानंतर जामीन

नवी दिल्ली ः झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आाहे. कारण सोरेन यांची अंतरिम जामिनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे हा सोरेन यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यनंतर त्याच धर्तीवर सोरेन यांनी देखील जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. कारण याचिकाकर्त्याने या प्रकरणातील आरोपपत्राची दखल घेतल्याचे तथ्य्यांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हेमंत सोरेन याचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपण अंतरिम जामिनाची मागणारी करणारी याचिका मागे घेतल्याचे सांगितले आहे. यापूर्वी दिल्ली हायकोर्टाकडून सोरेन यांना झटका बसला होता, त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने देखील नव्याने झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना म्हटले की, सोरेन यांची जामीन याचिका विशेष कोर्टापुढे अद्याप प्रलंबित आहे, तसेच कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वीच त्यांच्यावरील आरोपपत्राची दखल घेतली आहे. ही तथ्ये सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयाने का मांडली नाहीत. यावर सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी माफी मागितली. ही माझी व्यक्तिगत चूक आहे, माझ्या आशिलांची नाही असे त्यांनी कोर्टाला सांगितले. माझे आशिल सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावतीने कोर्टात मी हजेरी लावली आहे. आमचा कोर्टाची दिशाभूल करण्याचा हेतू नव्हता. आम्ही असे कधीही केलेले नसल्याचे सिब्बल यांनी सांगितले.

COMMENTS