Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशवादी हल्ले

दहशतवाद्यांचा पर्यटक आणि भाजपच्या नेत्यांवर गोळीबार

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून हल्ले सुरूच असून, दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा टार्गेट किलिंग केले आहे. तसे

चितळसर पोलिसांची कारवाई, घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक 
माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून हल्ले सुरूच असून, दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा टार्गेट किलिंग केले आहे. तसेच भाजपशी संबंधित असलेल्या इजाज नावाच्या माजी सरपंचावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. जम्मू-काश्मीरमधील शोपियान आणि अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाला. शोपियांच्या हीरपुरा भागात दहशतवाद्यांनी भाजपच्या माजी सरपंचाला लक्ष्य करून त्यांची हत्या केली.
टार्गेट किलिंग म्हणून दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. तर अनंतनागमघ्ये एका पर्यटक जोडप्यावर हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपशी संबंधित असलेल्या एका सरपंचाची हत्या करण्यात आली. एजाज अहमद शेख असे मृत माजी सरपंचाचे नाव आहे. अहमद शेख हे भाजपशी संबंधित होते. दरम्यान माजी सरपंचावर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले. दरम्यान, घटनेनंतर अहमद शेख यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आणखी एका दहशतवादी हल्ला काश्मीरमधील अनंतनाग भागात झाला. येथे दोन पर्यटक जखमी झालेत. या दहशतवादी हल्ल्यात जयपूरमधील एक महिला आणि तिचा पती जखमी झाल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. या पर्यटकांवर अनंतनाग जिल्ह्यातील यन्नार भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. फरहा आणि तबरेज अशी या दोन्ही पर्यटकांची ओळख पटली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. दरम्यान या हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केले. ’आम्ही पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करतो, ज्यात दोन पर्यटक जखमी झाले होते आणि त्यानंतर हुरपोरा, शोपियान येथील सरपंचावर झालेला हल्ला चिंतेचे कारण आहेत. दक्षिणेच्या निवडणुका विनाकारण लांबल्या. हे हल्ले चिंतेचा विषय असल्याचे त्या म्हणाल्या.

COMMENTS