पुणे ः भारतासह परदेशात महादेव बेटिंग या अॅपवर बंदी असतांना देखील या अॅपच्या माध्यमाद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिस
पुणे ः भारतासह परदेशात महादेव बेटिंग या अॅपवर बंदी असतांना देखील या अॅपच्या माध्यमाद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असतांना, या महादेव अॅपचे पाळेमुळे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. पुण्यातील नारायगाव परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी कारवाई करत तब्बल 70-80 जण ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. महादेव बुक अॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकर याने त्याचा मित्र रवी उप्पल याच्यासोबत महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप सुरु केले. यामाध्यमातून बेटिंगद्वारे गुंतवणुकदार कोटयावधी रुपयांची आर्थिक उलाढाल करु लागले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये अॅपचा मालक सौरभ चंद्रकार याने संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये थाटामाटात विवाह केला व त्यास अनेक प्रतिष्ठीतांसोबत कलाकरांची देखील हजेरी होती. त्यामुळे हे लग्न ईडीच्या रडावर येऊन त्यांनी सखोल तपास केला असता, मनी लॉड्रिगंचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणात ईडीने काही बॉलीवूड कलाकारांना देखील समन्स बजावून चौकशीसाठी हजर रहाण्यास सांगितले. आरोपींनी महोदव बुक अॅपसह इतर वेगवेगळे अॅप काढून त्यामाध्यमातून कोटयावधी रुपयांची जमवाजमव करुन विविध मालमत्ता खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे एका इमारतीतून सुरू असलेल्या कारभारावर पोलिसांनी छापेमारी मारत कारवाई केली. परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारीनंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची कामे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. ही कामे नारायणगाव येथील एका बड्या इमारतीत सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून पथकाला मिळाली. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी छापेमारी केली. या करवाईत 70 ते 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या इमारतीत छापा टाकला त्यावेळी अख्खी इमारतच महादेव अॅप संदर्भातील कामासाठी वापरली जात असल्याचे पुढे आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी सुरू आहे. तपासात अनेक धक्कादायक माहीती पुढे येण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. महादेव बेटिंग अॅपवर सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बंदी घातली होती. आयटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मनी लॉड्रिंक प्रकरणी सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महादेव बेटिंग अॅप व वेबसाइटवर बंदी घातली होती. या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत बॉलिवूड सेलिब्रिटी व राजकारण्यांची चौकशी केली आहे. तर अभिनेता साहिल खान याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर देखील महादेव बेटिंग अॅपचे जाळे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात आणि परदेशात पसरल्याचे समोर आले आहे.
नारायणगावमध्ये सुरू होते प्रोसेसिंग युनिट – यासंदर्भात अधिक माहिती देतांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, नारायणगाव येथे महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपचे अनुषंगाने आम्ही कारवाई केली आहे. सदर ठिकाणी एका इमारतीत प्रोसेसिंग युनिट असल्याचे दिसून आले आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी काहीजणांना आम्ही ताब्यात घेतले आहे.
COMMENTS