निवडणूक प्रचारात उघडपणे हिंदू-मुस्लिम करणारे भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये त्यांनी पुन
निवडणूक प्रचारात उघडपणे हिंदू-मुस्लिम करणारे भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये त्यांनी पुन्हा त्यांच्या नेहमीच्या शैलीत, माझा एक मुस्लिम मित्र होता, यापासून सुरुवात केली. हिंदू-मुस्लिम हे प्रकरण देशातच नव्हे तर जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात हायलाईट केल्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ प्रचारातच अडचणीत आले नव्हते, तर, त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा देखील डागाळली त्याचबरोबर त्यांनी सौदी अरेबिया किंवा मुस्लिम देशांमधून मोठ्या प्रमाणात जी गुंतवणूक शेअर बाजारात आणली होती, त्याचेही भवितव्य गडगडायला लागत असताना त्यांनी आपला पवित्रा बदलला. २००२ नंतर मला मुस्लिम विरोधी असल्याचे बदनाम करण्यात आले, असा आरोप लावला. अर्थात देशासमोर त्यांची प्रतिमा २००२ पासून २०२४ च्या म्हणजे १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत तर त्यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यावर ते हिंदूंचं मंगळसूत्र घेऊन हिंदू कुटुंबातील म्हशी घेईल आणि त्या मुस्लिमांना देईल, असं जाहीर आणि उघड वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद भारतीय प्रसार माध्यमातून तर उमटलेच, परंतु जगभरातल्या प्रसार माध्यमांनी त्यांच्या या वक्तव्याची गंभीरपणे दखल घेतली. गेल्याच आठवड्यात त्यांनी आपले मित्र आणि क्रोनिकॅपिटल च्या माध्यमातून देशात ज्या उद्योजकांच्या विरोधात आता जनभावना तयार झाली, त्या अडाणी-अंबानी यांचं नाव त्यांनी काळा पैसा त्यांच्याकडे असल्याच्या संदर्भात उघडपणे घेतलं होतं. या सगळ्या बाबी जर आपण पाहिल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता तीन फेज निवडणुकांचे म्हणजे तीन टप्पे मतदानाच्या आता उरलेले असताना, आपल्या वक्तव्यात ते सातत्याने बदल करत आहेत.
तो बदल म्हणजे त्यांच्या अस्थिर मनाचा तर निर्देशक आहेच; पण त्याचबरोबर आपल्या हातून सत्ता जाते आहे की काय, अशी एक परिस्थिती त्यांच्या समोर उद्भवल्याचेही ते स्पष्टपणे दिसत आहे. एकंदरीत नव्या लोकसभेच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षनेते म्हणून असतील की सत्ताधारी म्हणून ही जी चर्चा सुरू झाली, त्यात त्यांच्या हातून सत्ता जात आहे. असा निष्कर्ष आता केवळ निवडणूक विश्लेषकांनीच नाही तर भारतीय जनता पक्षाचे आणि संघाच्या नेत्यांनाही नेत्यांनी सुरू केला आहे याचाच अर्थ देशा त होणारा राजकीय बदल हा चार जून २०२४ च्या मतमोजणीतून स्पष्ट होईल पण तो इंडिया आघाडीला बहुमत देणारा असेल की अनेक पक्षांचा पुन्हा समावेश होऊन नवी सत्ता अस्तित्वात येईल, असा प्रश्न जर कोणी विचारला तर साधारणपणे आता सर्वच निवडणूक तज्ञ हे जाहीरपणे म्हणत आहेत. इंडिया आघाडीला आता सत्तेपासून कोणीही रोखू शकत नाही, याचा दुसरा अर्थ हाच होतो की नरेंद्र मोदी आता या सत्तेवर तिसऱ्यांदा आरूढ होऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांच्या संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर आल्या आल्या त्यांचं वय पुढच्या वर्षी ७५ होत असल्यामुळे त्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावं लागेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ते अमित शहा यांच्यासाठी मतदान मागत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा मतदारांवर फार परिणाम झालेला नाही; परंतु, मतदार आधीच ठरवून चुकला आहे की यावेळी आपल्याला सत्ता बदल केल्याशिवाय चालणार नाही. कारण महागाई आणि बेरोजगारी या दोन गंभीर प्रश्नांवर जनतेला लढावं लागत आहे. म्हणून हा लढा निवडणूक निर्णया मध्ये मोदींच्या विरोधात जाणारा ठरेल यात कोणतीही शंका नाही.
COMMENTS