अकोले ः अकोले तालुक्यात गुरुवारी सायंकाळी सुमारास वादळी वार्या सह जोरदार पावसाने घराचे पत्रे उडाले, अनेक झाडे, विजेचे खांब उन्मळून मोठे नुकसान
अकोले ः अकोले तालुक्यात गुरुवारी सायंकाळी सुमारास वादळी वार्या सह जोरदार पावसाने घराचे पत्रे उडाले, अनेक झाडे, विजेचे खांब उन्मळून मोठे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास राजूर, कोतूळ परिसरात ही अवकाळी पावसाने झोडपून काढले यात राजूर येथील पंढरीनाथ जयवंत मुतडक (वय 75) या शेतकर्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
राजूर परिसरातील पिपरकणे रस्त्यालगत शेतात जनावरांना चारा टाकत असताना दुपारी 2.30 वा सुमारास शेतकरी पंढरीनाथ जयवंत मुतडक (वय 75) यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही ठिकाणी विजेच्या खांबावरही झाडे पडल्याने विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचे उपअभियंता ज्ञानेश बागूल व वीज कर्मचार्यांनी पडलेले विजेचे उभे करून वीज पुरवठा सुरळीत केला. कोतुळ परिसरात ही शुक्रवारच्या आव काळी पावसात विजनवीतरण चे मोठे नुकसान झाले अनेक काळ वीज पुरवठा खंडित झाला होता स सहायक अभियंता प्रकाश कल्मबे या आपल्या सहकार्या सोबत घेऊन तातडीने वीज पुरवठा सुरळीत केला.
COMMENTS