Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्न पदार्थांच्या वेष्टनासाठी अल्युमिनियम फॉइल विकणार्‍या दुकानावर छापा

मुंबई ः मुंबईतील चेंबूर भागातील एका दुकानात भारतीय मानक ब्युरोने टाकलेल्या अंमलबजावणी छाप्यादरम्यान, असे आढळून आले की, या आस्थापनेत पदार्थांच्या

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अजित पवार राहणार गैरहजर
सत्र न्यायाधीशांच्या विरुद्ध सरन्यायमूर्तींकडे तक्रार
कंपनीच्या ट्रेलरने एका कामगाराला दिली धडक, घटना सीसीटीव्हीत कैद…

मुंबई ः मुंबईतील चेंबूर भागातील एका दुकानात भारतीय मानक ब्युरोने टाकलेल्या अंमलबजावणी छाप्यादरम्यान, असे आढळून आले की, या आस्थापनेत पदार्थांच्या वेष्टनासाठी बीआयएस मानक चिन्हरहित अ‍ॅल्युमिनियम आणि अ‍ॅल्युमिनियम मिश्र धातु बेअर फॉइल संचयित आणि विक्री केली जात आहे. चेंबूरमधील लोखंडे मार्गावर असलेल्या मेसर्स न्यू रायन प्लॅस्टिक या दुकानात या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात अ‍ॅल्युमिनियम फॉइल आणि त्यापासून तयार पॅकेजिंग साहित्य सापडले. या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सर्व ग्राहकांना बीआयएस प्रमाणित असलेल्या अनिवार्य उत्पादनांची यादी शोधण्यासाठी बीआयएस केअर अ‍ॅप (मोबाईल अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्याचे आवाहन केले जात आहे आणि ही उत्पादने खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर आयएसआय मार्कची वास्तविकता तपासण्याची विनंती केली जात आहे. त्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्या  ुुु.लळी.र्सेीं.ळप या संकेतस्थळाला भेट द्यावी. भारतीय मानक ब्युरोने नागरिकांना वारंवार विनंती केली आहे की त्यांना बीआयएस प्रमाणपत्राशिवाय अनिवार्य उत्पादने विकली जात असल्याचे आढळल्यास किंवा कोणत्याही उत्पादनावर आयएसआय मार्कचा गैरवापर होत असल्यास, त्यांनी इखड कार्यालयाला याची माहिती द्यावी.  

COMMENTS