Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहीर एकनाथ सरोदे यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार

लोणी ः आध्यात्मिक, धार्मिक,आरोग्य क्षेत्रात प्रचार म्हणून कार्य करणार्‍या फत्याबाद येथील शाहीर एकनाथ सरोदे यांना ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीसी

एच 3 एन 2’सह कोरोना बाधित रुग्णाचा नगरमध्ये मृत्यू
सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या संस्था व कृत्रिमरेतकांचा गौरव :परजणे
15% लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे

लोणी ः आध्यात्मिक, धार्मिक,आरोग्य क्षेत्रात प्रचार म्हणून कार्य करणार्‍या फत्याबाद येथील शाहीर एकनाथ सरोदे यांना ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीसीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय साई कलारत्न समाजभुषण पुरस्कार नुकताच शिर्डी येथे प्रदान करण्यात आला.
     एकनाथ सरोदे यांनी अध्यात्मिक कार्याबरोबरच कोविड काळात आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीतून समाज प्रबोधनाचा काम  करतानाच  शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर धार्मिक कार्यातील विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ते प्रचारक म्हणून अहमदनगर जिल्ह्यात करत आहेत याची दखल घेत ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीसीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय साई कलारत्न समाज पुरस्कार एकनाथ सरोदे  यांना सुदाम संसारे डॉ. अजय वारुळे, वंदना गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. एकनाथ सरोदे हे स्टार प्रचारक असून ते विखे पाटील कारखान्यात सुरक्षा विभागांमध्ये देखील कार्यरत आहे. त्यांच्या यशाबद्दल  राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्कर खर्ड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS