Homeताज्या बातम्यादेश

ईडीने केली 25 कोटींची रोकड जप्त

मंत्र्यांच्या नोकराच्या घरी सापडले घबाड

नवी दिल्ली ः देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने तब्बल 9 ठिकाणी छापेमारी केली असून, या

कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
घर नाही म्हणणार्‍या जयंत पाटलांच्या नावावर 3 कोटींचा बंगला
कोयत्याने वार करून सरपंचाचा टोळक्याकडून खून

नवी दिल्ली ः देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने तब्बल 9 ठिकाणी छापेमारी केली असून, यामध्ये झारखंड सरकारमधील एका मंत्र्यांच्या खाजगी सचिवाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला असून, यामध्ये अंदाजे 25 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नोटांचे ढीग पाहून ईडीचे अधिकारी देखील चक्रावले होते. यासोबतच ईडीने काही अभियंत्यांच्या घरी छापमेारी केली आहे. नोटा मोजण्यासाठी मशीनी मागवण्यात आल्या असून रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या नोटा नेमक्या कुठून आल्या? याची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे.  
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ईडीने सोमवारी पहाटेच्या सुमारास झारखंडमधील रांची शहरात अचानक छापेमारी केली. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या पीएच्या घरी काम करणार्‍या एका नोकराच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी जवळपास 25 कोटी रुपयांचे घबाड सापडले. नोटांचा ढीग पाहून ईडी अधिकारीही चक्रावले. पैसे मोजण्यासाठी बँकेतून कर्मचारी आणि मशीन मागवण्यात आल्या आहेत. सध्या ईडीचे अधिकारी नोकराची कसून चौकशी केली आहे. दरम्यान, हे पैसे मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचे असल्याचे नोकराने सांगितले आहे. निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी ईडीच्या पथकाने झारखंडमध्ये छापेमारी केली होती. झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्याशी संबंधित एकूण 24 ठिकाणी छापे टाकले होते. या काळात वीरेंद्र राम यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त 100 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली. छाप्यामध्ये दीड कोटी रुपयांचे दागिने आणि लाखोंची रोकडही सापडली होती.

निष्पक्ष तपास होईपर्यंत बोलणे योग्य नाही ः आदम – या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यात आलमगीर आलम यांचे खाजगी सचिव असलेले संजीव लाल, यांच्या नोकराच्या घरात नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिसत आहेत. आता याप्रकरणी मंत्री आलमगीर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजीव लाल आमचे पीए आणि सरकारी अधिकारी आहेत. याआधीही ते दोन मंत्र्यांचे पीए होते. अनुभवाच्या आधारे आम्ही सचिवांची नियुक्ती करतो. मी माध्यमांतूनच कारवाईची बातमी पाहिली. ईडी आपले काम करत आहे, निष्पक्ष तपास होईपर्यंत त्यावर काहीही बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आलमगीर आलम यांनी दिली.

COMMENTS