Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

21-नाशिक लोकसभा संघासाठी खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

नाशिक- 21 – नाशिक लोकसभा  मतदासंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 9 मे, 14 मे व 18 मे

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा – किरण पाटील
कोरोना रुग्ण संख्या थांबता थांबेना
सनी देओलचा ‘गदर 2’ च्या प्रमोशनला सुरुवात

नाशिक- 21 – नाशिक लोकसभा  मतदासंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 9 मे, 14 मे व 18 मे 2024 रेाजी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती 21 मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. उमेदवाराच्या खर्चाची पहिली तपासणी 9 मे 2024 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 आणि दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 या दोन सत्रात रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद नाशिक येथे होणार आहे. तसेच दुसरी व तिसरी तपासणी अनुक्रमे 14 मे व 18 मे 2024 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 आणि दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 या दोन सत्रात शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब शिवनेरी पहिला मजला सभागृह नाशिक येथे होणार आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी नियोजित वेळेत उपस्थित राहून त्यांच्या खर्चाचा हिशोब सादर करावा, असे पत्रकात करण्यात आले आहे.

विहित केलेल्या दिनांकास उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रदान केलेले ओळखपत्र, अभिलेखे, खर्चाचे रजिस्टर, मूळ प्रमाणके, अद्ययावत बँक पासबुक, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली परवानगी पत्रे घेवून वेळेत उपस्थित राहावयाचे आहे.  वेळापत्रकाप्रमाणे उमेदवार अथवा उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी विहित दिनांकास अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना उपलब्ध न करून दिल्यास  लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 प्रमाणे उमेदवाराने प्रतिदिन अभिलेखे ठेवले नसल्याचे समजण्यात येवून त्या प्रकरणी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही श्री. शर्मा यांनी कळविले आहे.

COMMENTS