Homeताज्या बातम्यादेश

देशाला उष्णतेच्या लाटेचा पुन्हा धोका

नवी दिल्ली: देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात बदल होतांना दिसून येत आहे. अनेक राज्यांत अवकाळी पावसानंतर आलेल्या उष्णतेच्या ला

साताऱ्याचे जवान विपुल इंगवले यांना उपचारादरम्यान वीरमरण | LOK News 24
राष्ट्रवादीच्या संजय कोरे यांना शिवसेनेची दारे खुली : सागर मलगुंडे
पूरग्रस्तांना वन बुलढाणा मिशनचा मदतीचा हात 

नवी दिल्ली: देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात बदल होतांना दिसून येत आहे. अनेक राज्यांत अवकाळी पावसानंतर आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. मे महिन्यात उत्तर भारतातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव पाहायला मिळत आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत आहे आणि या महिन्यात देशातील 15 राज्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7 मे ते 1 जून 2024 या कालावधीत ज्या  राज्यांचे पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे, त्यांचाही समावेश आहे. महासंचालक डॉ. एम मोहापात्रा म्हणाले, मे महिन्यात तापमान कसं असेल, याचा अंदाज लावला जात आहे. समुद्रात, जमिनीवर आणि वातावरणातील निरीक्षणे घेतली जात आहेत आणि ती गोळा केल्यानंतर, उच्च कार्यक्षमता मोजणीद्वारे, पुढील महिन्यात तापमान कसे असेल हे कळते. पश्‍चिमेकडील भागात, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील पश्‍चिमेकडील भाग आदी ठिकाणी मे महिन्यात 8 ते 11 दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील इतर भाग झारखंड, बिहार, दिल्ली, पंजाबमध्ये सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळते, तेथे मे महिन्यात 5 ते 7 दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

COMMENTS