Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री खोलेश्‍वर देवस्थानची यात्रोत्सवाची कुस्त्यांच्या हंगाम्याने सांगता

पाथर्डी ः शहराचे ग्रामदैवत श्री खोलेश्‍वर देवस्थाननाची यात्रोत्सवाची सांगता जंगी कुस्त्यांच्या हंगाम्याने चार दिवसानंतर झाली यात्रेदरम्यान भाविका

खर्डा येथे भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहात
माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर महानगरपालिकेचे लक्षणीय यश
राशीनच्या पालखी उत्सवातून 6 चोरटे ताब्यात

पाथर्डी ः शहराचे ग्रामदैवत श्री खोलेश्‍वर देवस्थाननाची यात्रोत्सवाची सांगता जंगी कुस्त्यांच्या हंगाम्याने चार दिवसानंतर झाली यात्रेदरम्यान भाविकांनी दर्शन घेतले.पूर्वाभिमुख असलेली श्री खोलेश्‍वरांची पिंड हे नगर जिल्ह्यामध्ये एकमेव वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान आहे. सोमवारी (ता.29) रोजी पैठणहून आणलेल्या कावडीच्या पाण्याने महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. मंगळवारी (30) रोजी सायंकाळी खोलेश्‍वरांच्या मुखवट्याची पाथर्डी शहरातून पालखी (छबीना) मिरवणूक,यात्रोत्सवानिमित्त वर्षभरातील एक बाजार खोलेश्‍वर परिसरात भरवण्याची जुनी प्रथेप्रमाणे बुधवारी मंदीर परिसरात आठवडे बाजार भरवण्यात आला.
गुरुवारी दुपारी जंगी कुस्त्यांचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रथम माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगरसेवक रमेश गोरे, यात्रा उत्सव कमिटीचे भास्कर बोरुडे, हरी बोरुडे,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमशेखर जिरेसाळ, सुरेश काटे, प्रसाद बोरुडे, शुभम सुपेकर, किशोर बोरुडे आदी उपस्थित होते. हंगाम्यात चितपट झालेल्या अनेक कुस्त्यांनी उपस्थित कुस्तीप्रेमींची मने जिंकली यात्रेनिमित्त खोलेश्‍वर यात्रा कमिटीच्या वतीने जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवून मैदानी कुस्तीला प्रोत्साहित केले.यात्रोत्सव समितीकडून पैलवानांना रोख स्वरूपात बिदागी देऊन मैदानी खेळाला प्रेरणा देण्याचे काम केले जाते.या हगाम्यात महिला कुस्तीपटूनही हजेरी लावली होती.या कुस्त्यांचे पंच म्हणून सुभाष बोरुडे सुदाम पानखडे, प्रसाद बोरुडे, महेश काटे यांनी काम पाहिले.यात्रा कमिटीच्या वतीने लावण्यात आलेली शेवटची मानाची अकरा हजार रुपयाची कुस्ती पै सागर कोल्हे विरुद्ध पै. वसंत फुलमाळी यांची कुस्ती बरोबरीत सुटली. माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, लक्ष्मण डोमकावळे आजिनाथ डोमकावळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, रवींद्र म्हस्के, किशोर बोरुडे, बाबासाहेब दुधाळ आदींसह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS