Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसे नेते अविनाश जाधववर खंडणीचा गुन्हा

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश ज

वीज कंपन्या कर्मचार्‍यांची दिवाळी होणार दणक्यात : उर्जामंत्री राऊतांनी केला बोनस जाहीर
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
ममते शिवाय समता नाही

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन (वय 55) यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील आपल्या कार्यालयात हिशेबासाठी बोलावले होते. त्यावेळी अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी तिथे आले. जाधव यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. इतकेच नाही, तर जैन यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS