Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळमध्ये पोलिस दलाचे पथ संचलन

अकोले : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अकोले पोलिस स्टेशन हद्दीतील  कोतुळ येथे आज मंगळवारी (ता.30) सकाळी 10 वा सुमारास सशस्त्र पोलिस दलाने पथ

अनधिकृत फलक हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज
आमदार आशुतोष काळेंनी भाविकांना केले फराळ वाटप
कोपरगाव तहसील कार्यालयात 6 लाखाचा अपहार

अकोले : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अकोले पोलिस स्टेशन हद्दीतील  कोतुळ येथे आज मंगळवारी (ता.30) सकाळी 10 वा सुमारास सशस्त्र पोलिस दलाने पथसंचलन केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तिसर्‍या टप्प्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने कोतुळ येथे शहरातील संवेदनशील आणि मिश्रवस्ती भागात उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य राखीव पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांनी पथसंचलन केले. कोतुळ येथील मतदान केंद्राची पाहणी केली करून सुरक्षितेबाबत आढावा घेतला.  पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचे सह तीन पोलीस उपनिरीक्षक राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी व जवान, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

COMMENTS