नाशिक - संसारातील कोणत्याही आनंदा पेक्षा पारमार्थिक आनंद श्रेष्ठ आहे. एका मॅनात जश्या दोन तलवारी राहु शकत नाही तद्वत एक असलेल्या अंतकरणात दोन गोष

नाशिक – संसारातील कोणत्याही आनंदा पेक्षा पारमार्थिक आनंद श्रेष्ठ आहे. एका मॅनात जश्या दोन तलवारी राहु शकत नाही तद्वत एक असलेल्या अंतकरणात दोन गोष्ठी राहु शकत नाही. तरुणांनी सक्षम राष्ट्राच्या उभारणी साठी पुढाकार घेऊन आपल्याही जीवनात भक्तिभाव, राष्ट्रभाव यांचा अंगिकार करावा असे आवाहन शिवलिंगस्वामी यांनी केले. दुर्गानगर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सहाव्या दिवसाचे किर्तनरूपी पुष्प गुंफले. ‘प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण’ या अभंगावर ते म्हणाले की , नवविधा भक्ती पैकी एक जरी भक्ती आपल्या हातुन घडली तर भगवंताचा आपणास स्पर्श झाल्या शिवाय राहणार नाही. आपल्या प्रारब्धाने भक्तीचा उत्कर्ष झाल्यास काम,क्रोध, लोभ, मोह, मत्सर व द्वेष हे आपोआप अंतकरणातुन बाहेर जातात. वाजे टाळ टाळया टाळी, होय होळी विघ्नाची, एवढी ताकद टाळ व टाळया वाजविण्या मध्ये आहे. टाळी वाजवत विठ्ठलाचे नामस्मरण करणाऱ्याच्या जवळही विघ्न उभे राहत नाही. तुकाराम महाराजानी सर्वांच्या
मनामध्ये भक्तिभाव, राष्ट्रभाव जागवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जाण्यासाठी मावळ्यांना तयार केले. याप्रसंगी सदाशिव शिंदे, खापरे मामा, डॉ मिश्रा, दादाजी अहिरे, शांताराम आव्हाड, रामदास श्रीशेठ, दत्तात्रय आंबेकर, राजाभाऊ कदम यांचेसह भाविक भक्त उपस्थित होते.
COMMENTS