Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत निवासी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन

राहुरी ः राहुरी येथील जोगेश्‍वरी आखाडा येथील इरिकेशन कॉलनीनजीक असलेल्या दुर्गामाता लॉन्स येथे श्री चैतन्य वारकरी शिक्षण संस्था यांच्यावतीने 3 ते 17 म

राजरत्न आंबेडकरांनी वैचारिक वारसा जपला ः आ. काळे
Ahmednagar : सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई | LOKNews24
हर घर तिरंगा भारताच्या एकजुटीचे प्रतीक ः मंत्री विखे पाटील

राहुरी ः राहुरी येथील जोगेश्‍वरी आखाडा येथील इरिकेशन कॉलनीनजीक असलेल्या दुर्गामाता लॉन्स येथे श्री चैतन्य वारकरी शिक्षण संस्था यांच्यावतीने 3 ते 17 मे 2024 या कालावधीत निवासी वारकरी बालसंस्कार शिबिर, संगित कार्यशाळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 दिवसीय शिबिरात योग प्राणायम, श्रीमदभगवतगीता, प्रार्थना, हनुमान चालीसा, हरिपाठ, पावल्या, वारकरी चाली, तबला, हार्मोनियम, पखवाज वादन-गायन शास्त्रीय पद्धतीने शिकविले जाणार आहे. शिबिर कालावधीत महाराष्ट्रातील प्रख्यात किर्तनकारांचे कीर्तने, मार्गदर्शन तसेच गुणिजन गायकांची भजन सेवा सादर केली जाणार आहे. शुक्रवार 17 मे रोजी काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. शिबिराचा समारोप झाल्यानंतर याठिकाणी श्री चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तरी या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संगीत विशारद गोपीनाथ वर्पे, ज्योती वर्पे, श्रुती वर्पे यांनी केले आहे.

COMMENTS