कोपरगाव शहर ः गोमांस बाळगणे अथवा विक्री करणे कायद्याने गंभीर गुन्हा असताना देखील दररोज मोठ्या प्रमाणात गोमांस पकडण्याच्या घटना उघडकीस येत असतात न
कोपरगाव शहर ः गोमांस बाळगणे अथवा विक्री करणे कायद्याने गंभीर गुन्हा असताना देखील दररोज मोठ्या प्रमाणात गोमांस पकडण्याच्या घटना उघडकीस येत असतात नुकतेच कोपरगाव शहर पोलिसांनी देखील शहर पोलीस स्टेशन हद्दीत 2 लाख 70 हजार रुपये किमतीचा 1700 किलो गोमांस जप्त करत मोठी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्ग टोलनाक्याजवळ शनिवारी 27 एप्रिल रोजी रात्री मोहम्मद शरीफ कुरेशी राहणार दादामिया उस्मान यांची चाळ कुर्ला मुंबई, रिजवान मलंग कुरेशी राहणार हाजी करमत अली रोड उस्मान गल्ली आजी मिया चाळ कुर्ला मुंबई हे टाटा कंपनीचा इट्रा व्ही एम एच 43 बी एक्स 8785 या टेम्पोमध्ये 150 रुपये किलो प्रमाणे 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे 1700 किलो वजनाचे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस भरून ते विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना कोपरगाव शहर पोलिसांना मिळून आला असता कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांच्या फिर्यादीनुसार मोहम्मद कुरेशी व रिजवान कुरेशी यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये 213/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1976 चे कलम 5,9,11 भांदवि कलम 188,279,271,34 साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार रुपयांचे मांस व 6 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा 8 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल के ऐ जाधव हे करत आहे.
COMMENTS