Homeताज्या बातम्यादेश

सुरत लोकसभा निवडणुकी विरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली ः गुजरात राज्यातील सुरत लोकसभा निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या निवडणुकीत काँ

स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी’ चा ट्रेलर रिलीज
सत्ता, समाज आणि सत्ताकारण !
आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार

नवी दिल्ली ः गुजरात राज्यातील सुरत लोकसभा निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतली होती, तर डमी उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यानंतर भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा विजय झाला. आता या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेत सूरतमध्ये निवडणूक बिनविरोध जिंकण्याची परिस्थिती टाळण्यासाठी नोटाचा उमेदवार म्हणून विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. नोटिशीत उत्तर देण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवखेडा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. नोटाला उमेदवार मानले जावे आणि नोटाला जर विजयी उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत सुरतचे उदाहरण दिले आहे. निवडणुक प्रक्रिये दरम्यान उमेदवारांनी माघार घेतली, एकच उमेदवार निवडणूक रिंगणात राहिला तर त्या व्यक्तीला बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात येते. परंतु ईव्हीएममध्ये नोटाचा पर्याय आहे. हा पर्याय असताना एखाद्या उमेदवारास बिनविरोध निवडून येण्याचा निर्णय जाहीर होणे चुकीचे असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देते, त्यावर यासंदर्भातील निकाल ठरणार आहे.

COMMENTS