Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चापडगावमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची बैठक उत्साहात

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या  गुंतवणूकदारांची गुरुवार 18 एप्रिल रोजी चापडगाव मधील रेणुका मा

*दैनिक लोकमंथन ; गुजरातमध्ये मृत्यूंची लपवाछपवी?’*
नगरच्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले
मदर्स डेला काळिमा…त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या  गुंतवणूकदारांची गुरुवार 18 एप्रिल रोजी चापडगाव मधील रेणुका माता मंदिर येथे सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे व शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये चापडगाव मधील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढचे पाऊल कसे उचलायचे याबाबत विचार विनिमय करण्यात आला. तसेच पोलीस जर पळून गेलेल्या शेअर मार्केट चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असेल तर प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही यावेळी बैठकीमध्ये एकमताने ठरविण्यात आले. तसेच गुंतवणूकदारांची फसवणूक झालेल्या प्रत्येक गावामध्ये याबाबत ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन पोलिसांवर यंत्रनेवर दबाव वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच शेवगाव तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनाही याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. झालेल्या या बैठकीला चापडगाव मधील युवक वर्गाने सहभाग नोंदविला. यावेळी गुंतवणूकदारांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. यावेळी जवळजवळ शंभर ते  ते दीडशे गुंतवणूकदार या बैठकीस हजर होते.

COMMENTS