TOP MENU
MENU
MENU
SEARCH
ताज्या बातम्या
शहरं
अहमदनगर
पुणे
मुंबई – ठाणे
सातारा
नाशिक
बीड
बुलढाणा
परभणी
छ. संभाजीनगर
मराठवाडा
विदर्भ
अन्य जिल्हे
राजकारण
महाराष्ट्र
देश
विदेश
संपादकीय
दखल
अग्रलेख
विशेष लेख
विधानसभा निवडणूक २०२२
हिमाचल प्रदेश आणि गुजरात
कृषी
लाईफस्टाईल
व्हिडीओ
ई-पेपर
Home
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख लंपास
Lokmanthan
0
April 24, 2024 3:30 am
बनावट शिक्के, स्वाक्षर्या करून बनावट चेकच्या मदतीने काढले पैसे
श्रीक्षेत्र ताहाराबादला ’पांडुरंग उत्सवा’ ला सुरूवात
छत्रपती संभाजीनगरात विनापरवानगी कँडल मार्च
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे निधन
बनावट शिक्के, स्वाक्षर्या करून बनावट चेकच्या मदतीने काढले पैसे
मुंबई : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार रूपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शालेय शिक्षण विभागाचे बनावट शिक्के वापरुन, बोगस स्वाक्षर्या करुन बनावट धनादेशांच्या मदतीने ही रक्कम काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
एकूण 10 धनादेश वापरून 47 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले हे पैसे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झिनत खातून या व्यक्तिंच्या खात्यावर जमा झाल्याचे देखील तपासात पुढे आले आहे. मात्र, हे चारही नावे कोणाची आहेत? यामागे नेमका कोणाचा हात आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अधिक तपास पोलिस अधिकारी करत आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालयातील बँकेत असलेल्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आली आहे. मंत्रालयातील बँकेतच असे प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, अशा प्रकारे शासकीय खात्यातून पैसे चोरीला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील पर्यटन विभागाच्या खात्यातून अशा प्रकारे चोरी करण्यात आली होती. त्यावेळी पर्यटन विभागाच्या खात्यातून 67 लाख रुपये चोरीला गेले होते. वास्तविक मंत्रालयात कोणत्याही व्यक्तीला सहज प्रवेश मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जाते. असे असताना मंत्रालयात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात सर्व माहिती असणार्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटन विभागातील 67 लाख रूपयांनंतर आता शालेय शिक्षण विभागातील 47 लाख रूपये लंपास करणार्यामध्ये नेमका कुणाचा हात आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचताच, याची माहिती पोलिस तपासात स्पष्ट होईलच.
–
आरोपीची बँक खाती पश्चिम बंगालमध्ये
महिन्याभरात दुसर्यांदा सरकारच्या खात्यातून पैसे चोरीला गेले आहेत. गेल्या महिन्यतच पर्यटन विभागाच्या खात्यातून 67 लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलिस करत आहे. एका महिन्यात दुसर्यांदा घटना घडत असून निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. मंत्रालयात जी बँक आहे तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली आहे ही सर्व खाती पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आहे. त्यामुळे आरोपी नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Newer Post
आचारसंहिता आणि आयोग ! 
Older Post
पंतजलीने 67 वर्तमानपत्रांमध्ये मागितली जाहीर माफी
COMMENTS
FACEBOOK:
© 2021 Lokmanthan. All rights reserved. Designed by Lokmanthan Team
Type something and Enter
COMMENTS