TOP MENU
MENU
MENU
SEARCH
ताज्या बातम्या
शहरं
अहमदनगर
पुणे
मुंबई – ठाणे
सातारा
नाशिक
बीड
बुलढाणा
परभणी
छ. संभाजीनगर
मराठवाडा
विदर्भ
अन्य जिल्हे
राजकारण
महाराष्ट्र
देश
विदेश
संपादकीय
दखल
अग्रलेख
विशेष लेख
विधानसभा निवडणूक २०२२
हिमाचल प्रदेश आणि गुजरात
कृषी
लाईफस्टाईल
व्हिडीओ
ई-पेपर
Home
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट
Lokmanthan
0
April 23, 2024 8:08 pm
अखेर घ़़रोघरी जाऊन भाजी विक्रीस मनपाची परवानगी
दुकानासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी
एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24 |
वाचन चळवळ अधिक समृद्ध व्हावी- डॉ जयश्रीताई थोरात
संगमनेर : यशवंतराव चव्हाणांचे वारसदार म्हणून ओळख असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी पुस्तके भेट दिली. पुस्तके हीच पुढील पिढी घडवत असून जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने लोहारे येथील वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली असून युवकांनी जास्तीत जास्त पुस्तकांशी मैत्री करावी असे आवाहन युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
सुदर्शन निवासस्थानी आमदार बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसानिमित्त आलेले पुस्तक लोहारे येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सार्वजनिक वाचनालयास देण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी समवेत वाचनालयाचे अध्यक्ष बाबासाहेब पोकळे, उपाध्यक्ष बाळासाहेब पोकळे, मुख्याधिकारी श्रीराम कु-हे,युवा कार्यकर्ते सचिन पोकळे ,किसन रणमाळे, योगेश पोकळे, प्रा. बाबा खरात ,अनिल सोमणी, पी. वाय दिघे, नामदेव कहांडळ आदीं उपस्थित होते.
यावेळी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, वाचनाने माणूस घडत असतो. म्हणून वाचन चळवळ अधिक समृद्ध झाली पाहिजे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यापासून थोरात घराण्यात वाचण्याची परंपरा आहे .आमदार बाळासाहेब थोरात हे कितीही कामात व्यस्त असले तरी त्यांचे नेहमी वाचन असते. वाचन ही त्यांची आवड आहे. आणि त्यामुळेच आपणासही वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
मात्र सध्याची तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी आहे. अद्यावत माहिती तंत्रज्ञानाबरोबर तरुणांनी पुस्तकांची मैत्री केलीच पाहिजे .कारण पुस्तके ही जीवनाची दिशा दर्शवितात. पुस्तकांचे ज्ञान हे प्रत्येकासाठी मोठे भांडवल असते. आणि ते आयुष्यभर पुरते. संगमनेर तालुक्यात वाचन चळवळ अधिक समृद्ध व्हावी अशी अपेक्षा करताना तरुणांनी पुस्तकांशी मैत्री करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Newer Post
पुस्तकांच्या विश्वात मुले रमली
Older Post
सिन्नर तालुक्यात स्कॉर्पिओचा भीषण अपघात
COMMENTS
FACEBOOK:
© 2021 Lokmanthan. All rights reserved. Designed by Lokmanthan Team
Type something and Enter
COMMENTS