Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुसर्‍यांचे आयुष्य फुलविणे हाच काकडे शैक्षणिक समूहाचा उद्देश

अ‍ॅड. डॉ. शिवाजीराव काकडे यांचे प्रतिपादन

शेवगाव तालुका ः आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील माजी गुणवंत पवित्र पोर्टल मार्फत वि

महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय कौतुकास्पद
विजेच्या शाॅकने बाळगीत कंत्राटी वायरमनचा मृत्यू l Lok News24
कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसाआड पूर्ववत करावा

शेवगाव तालुका ः आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील माजी गुणवंत पवित्र पोर्टल मार्फत विविध जिल्हा परिषद व शासनाच्या विविध आस्थापनावर नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव  सोहळा आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र  महाविद्यालय, शेवगाव येथे संपन्न झाला.  
प्रसंगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अ‍ॅड. डॉ. शिवाजीराव काकडे उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्थेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाविद्यालय सुरू ठेवले, अत्यंत आर्थिक अडचणीच्या काळातही संस्थेने महाविद्यालय सुरू ठेवले त्याचे कारण हेच की, हा  आर्थिक तोटा संस्थेला सहन करावा लागला तरी चालेल परंतु, यातून एक दिवस निश्‍चितच विद्यर्थ्यांच्या  जीवनात आनंद फुलवेल. या व्यापक उद्देशाने संस्थेने महाविद्यालय सुरू ठेवले आहे व आज तो दिवस सार्थ झाल्याचा अभिमान मला आहे. असे प्रतिपादन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख  काकडे यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या तथा  नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्‍वस्त पृथ्वीसिंह काकडे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ, आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालय व महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ.सुनील आढाव, आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर खिल्लारे आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य अरुण चोथे व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त झालेले दोन्ही महाविद्यालयाचे एकूण 32 विद्यार्थी व काही विद्यार्थ्यांचे पालक प्रतिनिधी या प्रसंगी  उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा  सन्मान, सत्कार  संस्थेचे प्रमुख अ‍ॅड. डॉ. शिवाजीराव काकडे जिल्हा परिषद सदस्या तथा  नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ हर्षदाताई काकडे संस्थेचे विश्‍वस्त पृथ्वीसिंह काकडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

COMMENTS