Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीराम साधना आश्रमामध्ये पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या श्रीराम साधना आश्रमामध्ये रामनवमी निमित्ताने आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगि

आमदार रोहित पवार यांच्या कामामुळे जनतेचा विश्‍वास
श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेची लूट
प्रवरेच्या कृषी व संलग्न शास्त्र संस्थेत विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या श्रीराम साधना आश्रमामध्ये रामनवमी निमित्ताने आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम नामाच्या जयघोषाने येथील वातावरण राममय बनले होते.

     प्रभू श्री रामचंद्र भगवंताच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महंत परमहंस मुक्तानंद महाराज वेल्हाळे संगमनेर यांचे कीर्तन झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जीवनात संतांची संगतीने केलेला परमार्थ फलद्रुप होत असतो तो परमार्थ आपणास प्राप्त व्हावा म्हणून महंत सुनीलगिरीजी बाबांनी श्रीराम साधना आश्रमाची येथे स्थापना करून आपल्या सर्वांना भक्ती मार्गाला लावले. आज येथे भव्य दिव्य कार्यक्रम झाले भक्तांना भगवंताचा येथे सहवास मिळत असल्याने हे क्षेत्र वैभवाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा संदेश देत त्यांनी श्रीरामनवमीच्या उपस्थित राम भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज, महंत परमहंस मुक्तानंद महाराज वेल्हाळे, खंडेश्‍वरी देवस्थानचे महंत श्री गणेशानंदगिरीजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, साध्वी सुवर्णानंद चैतन्य, संकेत महाराज पुरी, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, साहेबराव महाराज चावरे, बदाम महाराज पठाडे, केरळ येथील भक्त शेखर भैय्या, संतसेवक शिवभक्त विष्णूबाबा नाबदे, पी. आर.जाधव, भिवाजीराव आघाव, अशोक निपुंगे, दत्तात्रय कांगुणे, अमितराजे शिर्के,होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार संदीप गाडेकर, पत्रकार शंकरराव नाबदे, बाळासाहेब झावरे यांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. सेवेकरी सीमंतीनी बोरुडे व जयमाला जाधव यांनी श्रीराम जन्माचा पाळणा म्हटला. यावेळी झालेल्या जन्मोत्सव प्रसंगी पांडुरंग अभंग, साध्वी सुवर्णानंद चैतन्य, महंत सुनीलगिरी महाराजांच्या हस्ते पाळण्यातील रामल्लाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. पाळण्याची दोरी ओढून प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला.यावेळी सियावर रामचंद्र की जयजय श्रीरामअसा जयघोष यावेळी करण्यात आला. यावेळी श्रीराम जन्मोत्सव सोहळयात योगदान देणार्‍या देणगीदार तसेच दात्यांचा यावेळी स्वामी सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना शाबुदाना खिचडीचे वाटप प्रसादाच्या रूपाने करण्यात आले. रामनवमी निमित्ताने श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भगव्या झेंड्यांनी व उभारण्यात आलेल्या शामियान्यामुळे मंदिर परिसर मंगलमय बनला होता. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात केलेली भव्य रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. मंदिर प्रांगणात विविध दुकानांचे स्टॉल थाटण्यात आल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

COMMENTS