Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यातील निंबवी गावचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील विविध सुविधा आणि शासकीय योजना राबवुन तसेच, राबवण्याचे नुसते आश्‍वासने देण्यार्‍या राजकीय नेत्यांनी आमच्य

प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
शेतकर्‍यांच्या परवानगीनेच कृषी कायदे लागू होणार ; मंत्री सत्तार यांची ग्वाही
आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निमगाव वाघातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील विविध सुविधा आणि शासकीय योजना राबवुन तसेच, राबवण्याचे नुसते आश्‍वासने देण्यार्‍या राजकीय नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये, लोकसभा निवडणुक 2024 च्या मतदानवर आम्ही बहिष्कार टाकनार असल्याचे पत्र निंबवी गाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ठकसेन शिर्के यांनी काढले असून, त्याची एक प्रत माध्यमांना प्रसिध्दीस दिली आहे.
त्यात नमूद करण्यात आले आहे की, सर्व राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते की, मौजे निंबवी तालुका श्रीगोंदा गावची 900 हेक्टर जमीन विसापूर तलावात 1948 साली अधिग्रहित केली असून, आमच्या गावाला ना धरणग्रस्त दाखला ना हक्काचे पाणी मिळते. वेळोवेळी विविध राजकीय पदाधिकार्‍यांशी चर्चा करून, त्यांनी फक्त आम्हाला पाणी सोडण्याचे आश्‍वासने दिले आहे. परंतु, पाण्याचा एक थेंब ही तलावात सोडलेला नाही. यामुळे आमच्या निंबवी गावात कोणत्याही राजकीय व्यक्तीने येऊ नये. आम्ही मतदान केंद्रावर कोणत्याही पक्षाचे बूथ लावू देणारे नाही व आम्ही निंबवी गावचे सर्व ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकनार आहोत. याची सर्व राजकीय पक्षांनी दखल घ्यावी. अशी माहिती त्यात स्पष्ट करण्यात आली आहे. एक एक मत महत्वाचे असणार्‍या या निवडणुकीत सदर निंबवी गावच्या ग्रामस्थांची मतदानावर बहिष्कार करण्याची भावनेचा कोणता पक्ष आणि राजकीय व्यक्ती..? जाणून दखल घेतायेत.. हे लवकरच निदर्शनात येईल.

COMMENTS