Homeताज्या बातम्यासंपादकीय

यंदा चांगल्या पावसाचे वर्तमान

एप्रिल महिन्याचा मध्यावधी संपत आला असतांनाच आणि पाऊसाचे मळभ दूर झाल्यानंतर उन्ह इतके तप्त झाले आहे की, अंगाची लाहीलाही होतांना दिसून येत आहे. ताप

दंगल पेटवण्याचे षडयंत्र ?
भाजप-मनसेचा अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई

एप्रिल महिन्याचा मध्यावधी संपत आला असतांनाच आणि पाऊसाचे मळभ दूर झाल्यानंतर उन्ह इतके तप्त झाले आहे की, अंगाची लाहीलाही होतांना दिसून येत आहे. तापमानात प्रचंड वाढ होत असल्यामुळे उष्णतेच्या असह्य झळा सहन कराव्या लागतांना दिसून येत आहे. मात्र यासोबतच काही दिवसांपूर्वी स्कायमेट त्यांनतर आता भारतीय हवामान विभागाने चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा दुष्काळाचा कोटा यंदा तरी भरून निघेल अशी अपेक्षा बाळगण्यात हरकत नाही. गेल्या वर्षी राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये अपुर्‍या पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतांना दिसून येत आहे. राज्यातील हजारो वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदातरी अपुर्‍या पावसातून सुटका होईल अशी अपेक्षा बाळगण्यात हरकत नाही. हवामान विभागाने यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे. महाराष्ट्रात यंदा पाणी टंचाईचे बिकट संकट घोघांवातांना दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे अंग भाजून निघतांना दिसून येत आहे, तर दुसरीकडे पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था ग्रामीण भागात दिसून येत आहे. मुंबई, पुण्यात पाणीपुरवठा करणारे धरण, तलाव कोरडेठाक पडतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तर बिकट चित्र आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा हा संघर्ष यंदातरी सुटेल का अशीच अपेक्षा हा वर्ग करतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट असतांना त्यावर प्रभावी उपाययोजना होतांना दिसून येत नाही. त्यासोबतच राज्यात लोकसभा निवडणुका असल्यामुळे प्रशासन आणि सरकार देखील त्याकडे गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पाणी प्रश्‍नांवर उपाययोजना होतांना दिसून येत नाही. भारताची लोकसंख्येने 140 कोटींचा टप्पा ओलांडला असून, भारताकडे जगातील फक्त 4 टक्के गोड्या पाण्याचे स्त्रोत आहेत. संपूर्ण देशात पावसाळा सुरू होण्यापूर्वी, उन्हाळ्याच्या महिन्यांत नद्या आणि त्यांचे जलाशय कोरडे झाल्यामुळे भारतात पाण्याची टंचाई निर्माण होते. अलिकडच्या वर्षांत हवामान बदलामुळे संकट अधिक गंभीर झाले आहे, ज्यामुळे मान्सूनला विलंब होतो, परिणामी अनेक क्षेत्रांतील जलाशय कोरडे पडतात. भारतातील पाण्याच्या कमतरतेला कारणीभूत असलेले इतर घटक म्हणजे योग्य पायाभूत सुविधांचा अभाव उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष. पुरेसा पाऊस होण्यासाठी सर्वप्रथम वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे गरजेचे आहे. दरवर्षी देशामध्ये लाखो घरांची भर पडतांना दिसून येत आहे. लाखो वृक्षांची तोड होत असली तरी, त्यामानाने वृक्षलागवड होतांना दिसून येत नाही. परिणामी जमिनीची धूप होत नाही, पाणी जमिनीत मुरत नाही, झाडांअभावी जमिनीत पाणी धरून ठेवण्यात क्षमता कमी होते आणि पाणीसाठा अधिक खोलवर जातो. त्यामुळे वृक्षलागवड करणे अत्यावश्यक असतांना त्याकडे आपण दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. त्यामुळे तापमान कमी करण्यासठी सर्वप्रथम वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर होण्याची खरी गरज आहे, तरच पाणी टंचाईचे संकट दूर होईल, यंदा चांगला पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्याची जोपासणा करण्याची खरी गरज आहे.

COMMENTS