Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाळींचे भाव कडाडले ; तूरडाळ 15 रूपयांनी महाग

मुंबई ः यंदा देशात झालेल्या अपुर्‍या पावसामुळे डाळींचे उत्पादन देखील कमी प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे ऐन एप्रिल महिन्यामध्ये, लोकसभा निवडणुकीची र

शेतकरी कार्डधारकांना पैसे देण्यात अडचणींचा डोंगर
इथेनॉलमधील 75 टक्के हिस्सा शेतकर्‍यांना द्या : माजी खा. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा
पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

मुंबई ः यंदा देशात झालेल्या अपुर्‍या पावसामुळे डाळींचे उत्पादन देखील कमी प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे ऐन एप्रिल महिन्यामध्ये, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना डाळींचे भाव गगनाला भिडतांना दिसून येत आहे. तूरडाळ 15 तर मूगडाळ 10 रूपयांनी महागल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळी गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात मार्च महिन्यापासून डाळीचे दर वाढत आहेत. मुंबईत मार्च महिन्यात तूरडाळी घाऊक बाजरातील दर हा 120 ते 140 रुपये प्रतिकिलो होता. हा दर आता 140 ते 170 रुपये झाला आहे. तर किरकोळ बाजारात हा दर 140 रुपयांवरून 170 ते 190 रुपये प्रतिकिलो झाला आहे. घाऊक बाजारात 90 ते 100 रुपये असलेली मूगडाळ 100 रुपयांपर गेली आहे. या डाळीचा दर 110 ते 120 रुपये प्रतिकिलो झाला आहे. किरकोळ बाजारात मूगडाळीचा दर 140 रुपये प्रति किलो ऐवढा झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालक, मिल मालकांना तूरडाळीचा साठा घोषित करण्याची सूचना दिल्या आहेत.

COMMENTS