Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावलीतील शाळांमधे ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियानास प्रारंभ; जिल्हा परिषदेचा उपक्रम

कुडाळ : ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियानानिमित्त म्हसवे माची शाळेत पाटी पूजन करताना विद्यार्थी. पटवाढीसाठी होणार फायदाकुडाळ / वार्ताहर : जिल्हा परिष

पोलिसांनी अवैध व्यवसाय बंद न केल्यास भाजपा बंद करणार : धैर्यशील मोरे
आर्थिक शोषण करणार्‍यांना निवडणुकीत परिवर्तन करून धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील
सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख ; आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा

पटवाढीसाठी होणार फायदा
कुडाळ / वार्ताहर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील नवीन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियान राबवण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी गुढीपाडव्यापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. जावली तालुक्यातील शाळांमध्ये यानिमित्ताने दाखलपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. नवागतांचे स्वागत करण्यात येऊन पारंपरिक पाटी पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
जावली तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक गावातील दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी घेऊन शंभर टक्के दाखलपात्र विद्यार्थी शाळेत दाखल होण्यासाठी शिक्षकांकडून गृहभेटी घेण्यात आल्या. दाखलपात्र बालकांना पालकांसह शाळेत बोलावून पारंपरिक पाटीपूजनचा कार्यक्रम घेण्यात आला. नवीन विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. यानिमित्ताने पालकांही मार्गदर्शन झाले. यावेळी शाळांनी आपल्या वैशिष्ट्यांची व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाची माहिती दर्शनी भागात लावली होती. यानिमित्ताने शाळेत नव्याने दाखल होणार्‍या बालकांना आकर्षक भेट देऊन मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांकडे दिवसेंदिवस पालक व विद्यार्थी यांचा कल वाढत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हा परिषद नवीन उपक्रम प्रभावीपणे राबवत असल्याने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावत आहे. याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यात स्मार्ट स्कूल ही अभिनव योजना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळांचा पट वाढावा, यासाठी जिल्ह्यात ’गुढी पाडवा; पट वाढवा’ अभियान राबवण्यात येत आहे.

COMMENTS