Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढण्याचे संकेत

मुंबई प्रतिनिधी - आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेत अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना

साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी तिपायले
मनच सर्व गुणांचे उगमस्थान
धावत्या कंटेनरचा टायर फुटल्याने अपघात

मुंबई प्रतिनिधी – आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेत अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 असे जागावाटप झाले आहे. पण सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. कारण तिथून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, आता ही जागा ठाकरे गटाला सुटली आहे. त्यामुळं आता विशाल पाटील नेमकी भूमिका काय घेणार? याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं सध्या सांगलीचा तिढा सुटला की वाढला? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, उद्या सांगली काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्य पुढचा निर्णय होणार आहे. 

दरम्यान, सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर विशाल पाटील यांचे समर्थक, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमचं चुकलं काय? आता लढायचं अशा स्वरुपाचे विशाल पाटील यांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. त्यामुळं विशाल पाटील लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय

COMMENTS