Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीची आत्महत्या

पुणे ः पुण्यात वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन तिने आपल

एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं आयुष्य
हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना
पैशासाठी त्रास दिल्याने एकाची आत्महत्या : दोघांविरूध्द गुन्हा

पुणे ः पुण्यात वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन तिने आपले जीवन संपवले आहे. पुण्यातील गुरुवार पेठेत ही खळबळजनक घटना घडली. अभिलाषा मित्तल (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे आहे. अभिलाषा मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. गेल्या महिन्यापासून ती पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. या प्रकरणी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खूना आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्या की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिलाषा मित्तल ही तरूणी वाशिमची असून गेल्याच महिन्यात ती पुण्यात आली होती. पुण्यात राहून ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. यासाठी तिने पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये खोली घेतली होती. होस्टेलमध्ये राहणार्‍या अभिलाषाच्या मैत्रिणीने सांगितले की, अभिलाषा होस्टेलच्या खोलीत एकटीच होती. तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने मैत्रिणीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून आत डोकाले असता अभिलाषा पंख्याला लटकलेली दिसली. मैत्रिणीने याची सूचना तत्काळ पोलिसांनी दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासानुसार अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अभिलाषाचे नातेवाईक व मैत्रिणींची चौकशी करत आहेत.

COMMENTS