Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोजगारक्षम कौशल्य विकसित होणे गरजेचे ः डॉ.सतीश बिडकर

लोणी ः विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करायचे असेल तर युवा पिढी रोजगारक्षम असणे आवश्यक आहे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे कौशल्य विकसित होता

सुखदेव सुकळे यांचे कार्य भूषणावह
झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या कामास सुरुवात  
जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण

लोणी ः विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करायचे असेल तर युवा पिढी रोजगारक्षम असणे आवश्यक आहे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे कौशल्य विकसित होतात. नियुक्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नोकरी शोधणार्‍यांकडे आवश्यक कौशल्य नसतात, त्यामुळे बेरोजगारी कायम असते कौशल्य विकासाच्या संधी प्रदान करून व्यक्ती त्याच्या रोजगार क्षमता वाढू शकतात युवक-युवतींचा प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करून रोजगार तसेच स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे. यशस्वी व्यक्तीच्या यशामागे कौशल्य हेच एक कारण आहे, ते असेल तरच माणूस प्रत्येक क्षेत्रात त्यास्वतःला सिद्ध करतात म्हणून माणसाला जर स्वतःच्या स्वप्नांचा मागोवा घ्यायचा असेल तर कौशल्य आत्मसात करावे लागते विकसित कौशल्यामुळे काम करताना समाधानाची अनुभूती येते यासाठी रोजगारक्षम कौशल्य विकसित होणे गरजेचे असे प्रतिपादन डॉ.सतीश बिडगर यांनी केले.
 पायरेन्स आयबीएमए आयबीएममध्ये बार्कलेज आणि रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट द्वारे  रोजगार क्षमता वृद्धिंगत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन पायरेन्स आयबीएममध्ये आधुनिक काळातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे विकसित झालेल्या नवीन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे याकरता प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याचाच एक भाग म्हणून हा चार दिवसीय ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला प्रसंगी काशीफ खान सॉफ्ट स्किल ट्रेनर सय्यद मुस्तकिम, शशांक सहाय तज्ञ प्रशिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   युवकांनी नवीन कौशल्य आत्मसात करण्याकरता सदैव तत्पर असणे गरजेचे आहे व शिकण्याकरता ची अभिलाषा विद्यार्थ्यांमध्ये जागृत होणे गरजेचे आहे असे सॉफ्ट स्किल ट्रेनर काशीफ खान म्हणाले तर बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवीन कौशल्य संस्थेच्या विकासाबरोबर स्व- विकासास सहाय्यभूत ठरतात असे सॉफ्टस्किल ट्रेनर शशांक सहाय म्हणाले.

COMMENTS