सोनई : कृषिभूषण महाराष्ट्र एफ.पी.ओ. स्टार्टअप फेडरेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने रविवारी 31 मार्चला नाशिक येथे सोनईचे डॉ. सुरज शरदराव गडाख यांना

सोनई : कृषिभूषण महाराष्ट्र एफ.पी.ओ. स्टार्टअप फेडरेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने रविवारी 31 मार्चला नाशिक येथे सोनईचे डॉ. सुरज शरदराव गडाख यांना कृषीभूषण एक्सलन्स पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील कृषी विद्यापीठ, कृषी विस्तार क्षेत्रातील तज्ञ तसेच कृषी व्यावसायिक व उद्योजक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यात सोनई येथील डॉ. सुरज शरदराव गडाख यांना कृषीभूषण एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. सुरज गडाख यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विस्तार, कृषी संशोधन आणि कृषि शिक्षण या क्षेत्रांमध्ये शेतकर्यांना केंद्रस्थानी ठेवत उल्लेखनीय कार्य केले. डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विविध वाणांचे संशोधन आणि त्या वाणांना शेतकर्यांपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे पोहोचवण्याचे कार्य केले. तसेच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे सामाजिक कार्य केले त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ते सध्या कृषी विज्ञान संकुल, काष्टी, मालेगाव येथे वनस्पतीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. डॉ. सुरज गडाख यांनी वडील डॉ. शरदराव गडाख (कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यांच्या पावलावर पाऊल ठेवत कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
COMMENTS