Homeताज्या बातम्यादेश

कुरघोडी करणार्‍या चीनला खडसावले

अरुणाचलच्या 30 ठिकाणांची नावे बदलल्यावर भारताने दिला दम

नवी दिल्ली ः भारताचा शेजारी असलेला चीन नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. त्यासोबतच भारताच्या अंंतर्गत विषयामध्ये नाक खुपसण्य

दिशाभूल करणारी आयुर्वेदिक औषधे जप्त
सचिव भांगे पालकमंत्री भुमरे, आ. शिरसाटांना ठरले भारी
डबल इंजिन सरकार असलेल्या राज्यांची अवस्था पहा ! रेल्वे राज्यमंत्र्यांची ठाकरे सरकारवर टीका | LOK News 24

नवी दिल्ली ः भारताचा शेजारी असलेला चीन नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. त्यासोबतच भारताच्या अंंतर्गत विषयामध्ये नाक खुपसण्याची चीनची वाईट सवय आहे. अरूणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांची नावे बदलणार्‍या चीनला मंगळवारी भारताने चांगलेच सुनावले आहे. चीनने वेळीच सुधारावे. लबाडी सहन करणार नाही, असा सज्जड दमच भारताने भरला आहे.
चीनने काही दिवसांपूर्वी भारतातील अरुणाचल प्रदेशमधील काही भागांवर दावा केला. त्यानंतर या भागांची नावे बदलत एकूण नावे जाहीर केली आहेत. मात्र, चीनचा दावा तर्कहीन असल्याचे सांगत भारताने अरुणाचल प्रदेशवरील दावा फेटाळला. चीनने 30 जागांची नावे बदलल्याचा दावा केल्यानंतर भारतीय प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी चीनला प्रत्युत्तर दिले आहे. चीनचे अविचारी प्रयत्न सुरु आहेत. आम्ही त्यांचा दावा फेटाळतो. त्यांनी काही भागांचे नावे बदलल्याचा दावा केला असला तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच भविष्यातही राहील, असे रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले की, चीनने चुकीचे दावे करु नयेत. एकच बाब पुन्हा पुन्हा सांगून, काही भागांची नावे बदलू शकत नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये भारताचा कायदा, नियम आणि योजना लागू आहेत. तसेच यापुढे लागू राहतील. चीनच्या अरुणाचल प्रदेश दावा केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ’या प्रकारे भागांची नावे बदलल्याने ते तुमचं होणार नाही. मला एखादे घर आवडले. त्यानंतर माझ्या मर्जीनुसार, मी त्या घराला एखादे नाव दिले, तर ते घर माझे होऊ शकत नाही. चीनने अशा मुर्खासारख्या गोष्टी सोडून द्याव्यात असा सज्जड दमच जयशंकर यांनी चीनला दिला आहे.

COMMENTS