Homeताज्या बातम्यादेश

‘आप’ खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरील आव्हानाच्या

पत्रकारितेतील योगदानाबद्दल चंदन घोडके यांना भीमरत्न पुरस्कार
त्रिपुरा, मेघालयसह नागालँड निवडणुकीचा बिगुल वाजला
खासगी शाळांचे प्रश्‍न सोडवा

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरील आव्हानाच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात झालेल्या या सुनावणीत आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे. ते मागील सहा महिन्यांपासून अटकेत होते. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश पीबी वराळे यांच्या खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी केली. ‘खासदार संजय सिंह यांना तरुंगात ठेवण्याची गरज काय? असा सवाल या तिन्ही न्यायाधीशांच्या खंडपीठाने ईडीला केला. संजय सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं की, या मनी लॉड्रिंग प्रकरणाला दुजोरा मिळालेला नाही’ मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक आणि चौकशीला आव्हान देणारी याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ‘आप’ खासदार संजय सिंह यांच्या वकिलांच्या युक्तिवादावर विधान केलं. खासदार सिंह यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, संजय सिंह यांच्याकडून कोणाताही पैसा जप्त करण्यात आलेला नाही. त्यांच्यावरील दोन कोटी रुपये लाच घेण्याच्या आरोपांची चौकशी करता येईल’.

COMMENTS