Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नामांकनाच्या पहिल्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी भरला अर्ज 

बुलडाणा : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. संजय गायकवाड या

अवैद्य रेती उत्खना बाबत शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांचे खडकपूर्णा धरणामध्ये 2 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण
ड्रेसच्या बुकिंग साठी दिलेले एडवान्सचे पैसे परत देण्यास दुकानदाराचा नकार. संतापलेल्या तरुणाने दुकानात घुसून घातला गोंधळ
सेवेतील अधिकार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी

बुलडाणा : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. संजय गायकवाड यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 27 जणांनी 67 अर्जाची उचल केली. यातील संजय रामभाऊ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. उमेदवारांना कोरे नामांकन पत्र देणे, अनामत रक्कम भरणे तसेच अर्ज दाखल करण्यापूर्वी छाननीची व्यवस्था करण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दि. 4 एप्रिलपर्यंत वेळ असला तरी वेळेवर धावपळ टाळण्यासाठी इच्छुकांनी वेळेच्या आत अर्ज दाखल करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

COMMENTS