महाविद्यालयांच्या संख्येपेक्षा गुणात्मक दर्जा वाढविणे महत्वाचे – डॉ. नितीन करमाळकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयांच्या संख्येपेक्षा गुणात्मक दर्जा वाढविणे महत्वाचे – डॉ. नितीन करमाळकर

महाविद्यालयांच्या संख्येपेक्षा गुणात्मक दर्जा वाढविणे महत्वाचे आहे. प्रशासकीय कामकाज आणि संशोधन कार्य यांचे ताळमेळ होणे गरजेचे आहे. कोविड-१९ आजाराच्या परिस्थितीत आलेल्या समस्यांची पुर्नरावृत्ती होऊ नये यासाठी बृहत आराखडा तयार करतांना दक्षता घ्यावी.

आता दुकानातच मिळणार वाईन ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री शिंदेंनीच परत मागविली त्या 12 आमदारांची यादी
मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान 

नाशिक : महाविद्यालयांच्या संख्येपेक्षा गुणात्मक दर्जा वाढविणे महत्वाचे आहे. प्रशासकीय कामकाज आणि संशोधन कार्य यांचे ताळमेळ होणे गरजेचे आहे. कोविड-१९ आजाराच्या परिस्थितीत आलेल्या समस्यांची पुर्नरावृत्ती होऊ नये यासाठी बृहत आराखडा तयार करतांना दक्षता घ्यावी. आरोग्य क्षेत्रात पॅरामेडिकल कोर्सचे योगदान महत्वपूर्ण असून काळानुसार व गरजेनुसार योग्य बदल करणे आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यापीठाने आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांशी सामंजस्य करार करुन विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सकात्मक पध्दतीने विचार करावा असे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी सांगितले. 

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करणे संदर्भात पुणे विभागाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. विद्यापीठाचा सन २०२२ ते २०२७ करीता तयार करण्यात येणारा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा यासाठी सहभागी मान्यवरांनी ऑनलाईन बैठकीत महत्वपूर्ण चर्चा केली. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षेतेखाली बैठकीस विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण जामकर, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. रागिणी पाटील, डॉ. शाम गणवीर, डॉ. अभय पाटकर, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, आरोग्य क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, महाविद्यालयांचे अधिष्ठाता व प्राचार्य ऑनलाईन उपस्थित होते. विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले की, सध्याच्या कोविड-१९आजाराच्या परिस्थितीत आरोग्य सेवेचे कार्य महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे. विद्यापीठाने कमी कालावधीतील विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्राधान्य द्यावे जेणेकरुन होतकरु तरुण आरोग्यसेवेचा भाग होऊ शकतील. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विविध संस्थांशी करार करावा जेणेकरुन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नावीन्यपूर्ण कोर्स तयार करावेत ज्याचा समाजाला व आरोग्य क्षेत्रात मोठया प्रमाणात उपयोग होईल असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे माजी. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन एकबोटे यांनी सांगितले की, विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्ययावत करतांना ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा व लोकसंख्या यांचा सकारात्म विचार करावा. कोविड-१९आजाराच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान अद्यायावत करावे. यासाठी विद्यापीठाने कार्यशाळा व ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान व उपचारसंबंधी पदवीका कोर्स सुरु केल्यास आरोग्य यंत्रणा मजबूत होईल. आरोग्य सेवा संदर्भात शासनाचे ग्रामिण व दूर्गम भागात अनेक उपक्रम कार्यान्वीत आहेत. याअनुषंगाने अभ्यासक्रम व सेवा-सविधा देण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार केल्यास समाजाला त्याचा अत्यंत उपयोग होईल असे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रादेशिक विभाग निहाय बृहत आराखडा बैठकीचे ऑनलाईन आयोजन करण्यात असून दि. १४ जून रोजी उत्तर महाराष्ट्र, दि. १६ जून रोजी मराठवाडा व दि. १७ जून रोजी विदर्भ विभागाकरीता ऑनलाईन सदर बैठका घेण्यात येणार आहेत. संबंधितांनी ऑनलाईन बैठकीची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर ऑनलाईन बैठकीत आपले अभिप्राय किंवा सूचना मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. या ऑनलाईन बैठकीचे समन्वयन विद्यापीठ नियोजन विभागाचे प्र. संचालक डॉ. राजीव आहेर यांनी केले. या ऑनलाईन बैठकीस विविध संस्थांचे संस्थाचालक, प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS