Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार

पुणे प्रतिनिधी - महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्य

तलावात बुडून ५ मुलांचा मृत्यू
वाढते दहशतवादी हल्ले चिंताजनक
साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार : पालकमंत्री छगन भुजबळ

पुणे प्रतिनिधी – महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे किल्ले शिवनेरीवर गेले होते. किल्ले शिवनेरीवर आलं की संघर्षाची आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळते, असं कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे शिवनेरीवर गेले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि महायुतीचे शिरूरमधील संभाव्य उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील शिवनेरीवर आले होते. यावेळी हे दोघे नेते एकमेकांसमोर आले. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. तर अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील लढतील. मागच्यावेळीही हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात लढले होते. आज हे दोघे एकमेकांसमोर आल्यावर त्यांनी हस्तांदोलन केलं.

COMMENTS