Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

बीड ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे या प्रचारासाठी जात असताना त्यांची

 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला
मुंडे भगिनींना डावलण्या मागे नेमका कुणाचा हात ? lपहा LokNews24
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास भेट

बीड ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे या प्रचारासाठी जात असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. या दरम्यान पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवत, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांना सोम्य बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवावे लागले. मात्र, आंदोलन करणारे मनोज जरांगे यांचे आंदोलक नसून विरोधी राजकीय पक्षांचे लोक असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर केला आहे.
याबाबत आपण पोलिसांकडून माहिती घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक या लोकसभा मतदारसंघात त्यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे या खासदार होत्या. मात्र, प्रीतम मुंडे यांना डावलात पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले असल्याची चर्चा आहे. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचाच काहीचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील येत आहे.

COMMENTS