Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळ्यात बुडून मायलेकांचा मृत्यू

जालना ः शेततळ्यात बुडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील कडवंची येथे घडली. समाधान मानिक वानखेडे (23) आणि सुमित्रा मानिक

तटस्थ निवडणूक आयुक्त निवड समितीचा पेच !
Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)
जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे उपविभागीय कार्यालयासमोर भजन व थाळीनाद आंदोलन

जालना ः शेततळ्यात बुडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील कडवंची येथे घडली. समाधान मानिक वानखेडे (23) आणि सुमित्रा मानिक वानखेडे (40) अशी मयत दोघांची नावे आहेत. समाधान आणि त्याची आई सुमित्रा दोघे ही सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात गेले होते, मात्र दुपार झाली दोन्ही जण अजून कसे परतले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते कुठे ही मिळून आले नाही. दरम्यान काही वेळानंतर नातेवाईकांना शेततळ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले.

COMMENTS