Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आचार संहितेचा भंग ऑनलाईन तक्रार दाखल 

फिरते भरारी पथकाने केली कार्यवाही

बुलढाणा - सरकारी टिबी दवाखाना समोरील तलावाचे सौंदर्यीकरण समारंभ अंदाजे पाच कोटी कामाचे भूमिपूजन फलक लावण्यात आला होता, त्यावर पंतप्रधान नरेंद्र

प्लास्टिक बॅगमध्ये सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे
एमआयडीसी वरील प्रश्नांवर मनसे आक्रमक 
हॉटेल एक्सप्रेस इन इथल्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

बुलढाणा – सरकारी टिबी दवाखाना समोरील तलावाचे सौंदर्यीकरण समारंभ अंदाजे पाच कोटी कामाचे भूमिपूजन फलक लावण्यात आला होता, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणविस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.गुलाबराव पाटील खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार पुत्र कुणाल गायकवाड, शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांचे फोटो तर  भारतीय जनता पार्टी  व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे नाव भूमिपूजन फलकावर छापण्यात आले होते, तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.17 मार्च पासून जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्या मुळे सदर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर फलक काढले नसल्यामुळे, सजग नागरिकाने दि.26 मार्च रोजी 1वाजून 55 मिनिटाला सीविजिल एपवर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती तक्रार आयडी क्रमांक 820102 वरून करण्यात आली. तर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आचार संहिता भरारी पथक क्रमांक एक चे वाहन क्रमांक एम एच 28 सी 6301 पथक प्रमुख एस एस पिंपरकर, रोपवाटिका कृषी अधिकारी सचिन चेके हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व सदर फलक काढले, पुढील कार्यवाही उपविभागीय अधिकारी शरद पाटिल, व मुख्य निवडणुक अधिकारी काय कार्यवाही करणार की या नाम फलकावर मोठ्या व सत्ताधारी  नेते मंडळीचे फोटो असल्यामुळें कार्य वाहीला बगल दिली जाईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS