पुणे ः पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसर्यांदा मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आ
पुणे ः पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसर्यांदा मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. बेकायदेशीर सावकारकी करणे, खंडणी उकळणे, अपहरण करणे खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे या व अशा गुन्हेगारी कारवाया करणारा व मध्यंतरी फरार असणारा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याआधीच दोन वेळा मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) दाखल केलेला आहे. तरीही गायकवाडची गैरकृत्ये थांबत नसल्याने त्यानंतर आता पुन्हा आणखी एकदा संघटित गुन्हेगारीचा टोळीप्रमुख नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड त्याची पत्नी नंदा व मुलगा गणेश यांच्यावर पुणे पोलिसांनी तिसर्यांदा मोक्का दाखल केला आहे. यावरून गायकवाड हा तीन-तीन वेळा मोक्का लागणारा गुन्हेगार ठरला आहे. त्याने केलेल्या आर्थिक गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठीच्या दृष्टीने हा तिहेरी मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, एखाद्या व्यक्तीस मृत्यू फौजदारीपात्र कट रचणे, बेकायेदशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
COMMENTS