Homeताज्या बातम्यादेश

निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींच देशवासियांना खास पत्र

नवी दिल्ली प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा आज कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खास पत्र लिहिलं

शेतकर्‍यांना सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध
नरेंद्र मोदी आज तिसर्‍यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
भारत सेमी कंडक्टरमुळे ग्लोबल हब बनेल

नवी दिल्ली प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचा आज कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खास पत्र लिहिलं आहे. “तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या सोबतीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या 140 कोटी कुटुंबीयांसोबतच हे विश्वासाच, सहकार्याच आणि समर्थनाच नात माझ्यासाठी किती विशेष आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकतं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे. “माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल हेच मागच्या 10 वर्षातील आमच्या सरकारच यश आहे. आम्ही प्रत्येक धोरण, निर्णय या माध्यमातून गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा, त्यांना अजून सशक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्वांना पक्की घरे, सर्वांना वीज, पाणी, गॅस, आयुष्मान भारत योजनेद्वारे उपचाराची व्यवस्था, शेतकरी भाऊ-बहिणींना मदत, मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून माता-भगिनींना सहाय्यता हे सर्व प्रयत्न फक्त तुमच्या विश्वासाची साथ असल्यामुळे शक्य झालं” असं मोदी म्हणाले. “विकास आणि वारसा सोबत पुढे घेऊन जाणाऱ्या भारताने मागच्या एक दशकात पायाभूत सुविधांच अभूतपूर्व निर्माण पाहिलं. समृद्ध संस्कृती आणि परंपरेसोबत पुढे जाणाऱ्या देशाचा आज प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

COMMENTS