कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खा सदाशिवराव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तर शिवसेना
कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खा सदाशिवराव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका कार्यकारणीच्या शिवसेना आघाडीच्या युवा सेनेच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन तसेच खा. सदाशिव लोखंडे व जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची भूमिका घेतल्याने मागील महिन्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या युवा सेना तालुकाप्रमुख अभिषेक आव्हाड व उपतालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला असता त्यांची आव्हाड यांनी शिवसेनेच्या युवा सेना तालुका प्रमुख पदी तर गुंजाळ यांची उपतालुका प्रमुखपदी तर सोनेवाडी येथील प्रवीण सोमनाथ शिंदे यांची युवा सेनेच्या जिल्हासमन्वयक पदी तर मढी येथील किरण गवळी यांची युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक शैक्षणिक राजकीय आदी विविध क्षेत्रातील व पक्षातील एकनिष्ठेची दखल घेत वरील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून शिवसेना संघटना बांधणीसाठी अभिषेक आव्हाड, अक्षय गुंजाळ, किरण गवळी व प्रवीण शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे याच कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींकडे त्यांना युवा सेनेचे पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून शिफारस व पाठपुरावा केला होता असे नितिनराव औताडे यांनी सांगत सर्वांचे अभिनंदन केले आहे तर या सर्व नवनिर्वाचित युवा सेनेच्या पदाधिकार्यांचा कोपरगाव शहर व तालुका शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.
COMMENTS