Homeताज्या बातम्यादेश

‘घड्याळ’ चिन्ह ही वापरू नका

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात असतांना, राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची, याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या नि

क्लास चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
महाविकास आघाडी म्हणजे तिन तिगाडा काम बिगाडा – केशव उपाध्याय
भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, पाच जणांचा मृत्यू | LOKNews24

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात असतांना, राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची, याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गट हा शरद पवार यांचे आणि फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी घड्याळ चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो वापरू नका अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेवर गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली. कोर्टात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करत शरद पवार यांची बाजू मांडली. मोठा युक्तिवाद करत अजित पवार गट शरद पवार यांचे नाव तसेच फोटो वापरत असल्याचा आरोप सिंघवी यांनी करत यावर आक्षेप नोंदवला. याचा पुरावा अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात दिला. सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाचे हे पोस्टर्सवर न्यायालयाने पहावे. त्यावर शरद पवारांचे फोटो आणि नाव आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह दिल्यावर अजित पवार गट शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह कसे वापरू शकतात असा सवाल करत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टापुढे केली.सर्वोच्च न्यायालयाने याची दाखल घेतली असून अजित पावर गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरता येणार नाही असे म्हणत ते न वापरण्या संदर्भात असे लेखी देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या बाबत तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना देणीयचे देखील कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 18 मार्च रोजी घेतली जाणार आहे.

‘घड्याळ’ चिन्हाच्या वापरावरही युक्तिवाद – अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर करण्यावर सिंघवींनी घेतलेल्या आक्षेपावरही न्यायालयाने मत नोंदवले. आम्ही तुम्हाला हा सल्ला देत आहोत की तुम्ही घड्याळ चिन्हाचा वापर न करता दुसर्‍या कुठल्यातरी चिन्हाचा वापर करा. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयासमोर याचिका आलेली आहे. जर आम्ही आयोगाचा निकाल रद्दबातल ठरवला, ऐन निवडणुकीच्या मध्यावर आमचा निकाल आला तर तुम्ही काय कराल? असा प्रश्‍न न्यायालयाने केला. त्यामुळे शरद पवार गटाकडे वेगळे चिन्ह आहे, तर अजित पवार गटही वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक का लढवत नाही? जेणेकरून न्यायालयाच्या निकालाचा कोणताही परिणाम तुमच्यावर होणार नाही आणि तुमचे काम तुम्हाला विनासायास करता येईल. या सल्ल्यावर तुम्ही विचार करा, असे न्यायालयाने नमूद केले.

COMMENTS