Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांना गुलाल लागू देणार नाही

मनोज जरांगेंचा पुन्हा जोरदार हल्लाबोल

हिंगोली ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट शब्दात टीका केली आहे. उपमुख्यम

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
अन्यथा फडणीवासांचे राजकारण संपवेन!
सरकारने मोटरसायकल दिली, पण पेट्रोल काढून घेतलं – मनोज जरांगे

हिंगोली ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट शब्दात टीका केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लावू न देण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. सरकारने मराठा आरक्षणातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील वातावरण दूषित झाले आहे. जनतेत नाराजीची प्रचंड लाट आहे. ही चूक किती महागात पडेल हे फडणवीस यांच्या लक्षातही येणार नसल्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, ते किती खुनशी आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण मराठे किती खुनशी आहेत हे त्यांना माहिती नाही. मराठा समाज आता आयुष्यभर फडणवीस यांच्या डोक्याला गुलाल लागू देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील हिंगोलीच्या संवाद बैठकीत बोलताना म्हणाले.फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्‍वास घ्यावा लागतो, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे पाटील सध्या परभणीच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी एकाच दिवशी 5 ठिकाणी संवाद बैठका घेतल्या. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विशेषतः त्यांनी फडणवीस यांना आपल्यासोबत उपोषणाला बसण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, माझे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान आहे. त्यांनी हिंमत असेल तर 8 दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्‍वास घ्यावा लागतो. वजन कमी करायचे असेल तर या आणि माझ्यासोबत उपोषणाला बसा. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आई-बहिणीविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप केला. त्यांना 2 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी लागलेली मुलगी आई-बहीण वाटली नाही का? त्यांनी त्यांना वाटेल ते करावे, मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमच्या आया-बहिणींना आजही नीट चालता येत नाही. कारण, लाठीचार्जमध्ये त्यांना जबर मार लागला आहे. तेव्हा तुम्हाला आमच्या माता-भगिनी दिसल्या नाही का? तुम्ही लाठीमार करणार्‍या पोलिसांवर केवळ 10 दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्याचवेळी आम्हाला तुमची मराठ्यांविषयीची नियत दिसली नाही का ? असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी यावेळी उपस्थित केले.

COMMENTS