Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 महिलांसाठी शासनाच्या विविध स्वयंरोजगाच्या संधी 

सातपूर :- महिलांसाठी शासनाच्या विविध स्वयंरोजगाच्या संधी आहेत.अशा संधीचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे.महिला पुरुषांपेक्षाही चांगले काम करु शकतात.हे

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ?
दुर्गाताई तांबे यांना आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्कार
Ahmednagar : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्यावर भीषण अपघात (Video)

सातपूर :- महिलांसाठी शासनाच्या विविध स्वयंरोजगाच्या संधी आहेत.अशा संधीचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे.महिला पुरुषांपेक्षाही चांगले काम करु शकतात.हे त्यांनी कृतीने सिद्ध करुन दाखविले आहे.असे प्रतिपादन मनपा मायको रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ.रुचिता पावसकर यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुंभार समाज उत्कर्ष मंडळ संचलित कुसुम महिला सखी मंचच्यावतीने सोमवारी आयोजित महिला सबलीकरण या विषयावर त्या बोलत होत्या.तर डॉ गौरी बोरुडे यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की,महिलांना नोकरी,व्यवसाय करुन घर सांभाळत असतांना तारेवरची कसरत करावी लागते.त्यामुळे त्यांनी आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे.असे आवाहन केले.अध्यक्षस्थानी शकुंतला जोर्वेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुसुम संस्थेचे अध्यक्ष प्रा. तुळशीराम मोरे,सेक्रेटरी गुलाबराव सोनवणे, राजेंद्र सावंदे,अरुण बागुल,नारायण सोनवणे, अनिल मोरे,गंगाधर जोर्वेकर,वसंत चव्हाण, दत्तात्रय सोमवंशी,किरण बोरसे,पोपट बोरसे, जगदीश मोरे आदी उपस्थित होते.प्रास्तविक सुवर्णा जाधव यांनी केले.स्वागत उषा बोरसे यांनी केले.सूत्रसंचालन सविता जगदाळे यांनी केले.उषा चित्ते यांनी आभार मानले.यावेळी कुसुम सोमवंशी,शोभा सोनवणे,मीना पुंडलिक सोनवणे,कल्पना सावंदे,लक्ष्मी सोनवणे,पुष्पा चव्हाण,रेखा बाहिकर,हिराबाई खैरनार,निर्मला चव्हाण,मीना काळे,कल्याणी बोरसे,प्रमिला शिंदे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

COMMENTS