Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे

जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून एल्गार

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातून हरवून गेलेला विकास, वाढती गुन्हेगारी, शासकीय कार्यालयात वाढती भ्रष्टाचार प्रकरणे, पिण्याच्या पाण्यापासून होणार

LOK News 24 । ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का
नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी
शर्मिला गोसावी यांना रमाई गौरव पुरस्कार जाहीर

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातून हरवून गेलेला विकास, वाढती गुन्हेगारी, शासकीय कार्यालयात वाढती भ्रष्टाचार प्रकरणे, पिण्याच्या पाण्यापासून होणारे हाल याला जबाबदार आहेत ते आजचे लोकप्रतिनिधी. आजही तालुक्यातील प्रश्‍न जसेच्या तसेच आहेत. आजी-माजी आमदारांनी फक्त त्यांचे बगलबच्चे मोठे करण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली नाही. त्यामुळे हे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी तुमच्या सर्वसामान्यांच्या बळावर मी विधानसभेचे रणशिंग फुंकत आहे. त्यासाठी तुमची साथ मोलाची असल्याचे प्रतिपादन जि.प. सदस्या  हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव येथे केले. शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शेवगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक विक्रम ढाकणे हे होते. तर कार्यक्रमास अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, राजू जिजा पातकळ, आबासाहेब काकडे, रज्जाक शेख, माणिक गर्जे, भागवत भोसले, देविदास गिर्हे, भिवसेन केदार, नवनाथ खेडकर, विष्णू गरड, बबन पवार, मनोज घोंगडे, पृथ्वीसिंह काकडे,  मनोज घनवट, सुनील गवळी, भागचंद कुंडकर, सुरेश चौधरी, चंद्रकांत काकडे, निवृत्ती चव्हाण, अशोक दातिर, गणपत फलके, रंगनाथ ढाकणे, शेषराव फलके, नारायण टेकाळे, मारुती पांढरे, भाऊसाहेब आव्हाड, अशोक दातीर, नशिर बेग आदि यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना काकडे म्हणाल्या की, सर्वसामान्यांचे प्रश्‍नासाठी व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी निवडणूक रिंगणात येत आहे असेही त्या बोलतांना म्हणाल्या. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मेळाव्यासाठी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब सातपुते, माणिक गर्जे, अशोक पातकळ यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब देवढे यांनी तर प्रास्ताविक अशोकराव ढाकणे यांनी केले. उपस्थितीताचे जगन्नाथ गावडे यांनी आभार मानले.

COMMENTS