ढाका : बांगलादेशमधील खुलना जिल्ह्यातील गौरा गावात धर्मांध कट्टरतावाद्यांनी मंदिरावर हल्ला करत तेथे नासधूस आणि तोडफोड करण्याची घटना घडली आहे. यामध्ये
ढाका : बांगलादेशमधील खुलना जिल्ह्यातील गौरा गावात धर्मांध कट्टरतावाद्यांनी मंदिरावर हल्ला करत तेथे नासधूस आणि तोडफोड करण्याची घटना घडली आहे. यामध्ये मंदिरांतील देवतांच्या मूर्तींचेही नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.
या घटनेनंतर बांगलादेशातच नव्हे तर जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बांगलादेश हिंदू युनिटी काउंसिलसह हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेनंतर बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण आहे.
काय आहे पार्श्र्वभूमी शुक्रवारी रात्री नमाजाच्या वेळी सुरू असलेल्या भजनाच्या मुद्यावरून हा वाद झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. या वादाचे पर्यवसान पुढे मंदिर तोडफोडीत झाले. शनिवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान हा हल्ला झाला. शियाली, मलिकपुरा आणि गोवरा गावात शेकडो कट्टरतावादी, धर्मांध एकत्र आले त्यांनी मंदिर व हिंदू घरांवर हल्ले केले. या हल्ल्यात सहा मंदिराची नासधूस झाली. तसेच ५७ हून अधिक हिंदू कुटुंबावर हल्ला झाला. काही घरांना आग लावण्यात आली. तर घरे, दुकानांचीही लूट करण्यात आली. या हिंसक हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत १० संशयित हल्लेखोरांना अटक केली. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील गणपती मंदिरातही तोडफोड करण्यात आली होती.
COMMENTS